Saturday, 9 August 2014

उंबरठा

ओली असे पहाट, मुक्त तो घाट.
वृक्ष ते घनदाट ,डोळ्यात तुझीच  वाट.

मेघ उन्मेदून कडाडले ,रस्ते काळोखाने दाटले.
पाणी डोळ्यात साठले , सरी बरसायची थांबले.

दुभंगली  सारी  धरती ,नेत्र माझे तुला शोधती.
पक्षी  हे  किलबिल करती। मनाची या हरली शांती.

न सांगता तुझे मला सोडून जाणे, परतीची तुझ्या आस धरती.
पाउले न मागे  फिरती , जरी लोचनी आली  भरती.

वारा  आता  झाला  शांत , धरणीलाही फुटला भ्रांत।
सृष्टी जरी  झाली निवांत , तरी अजूनही उभी मी उंबरठ्यात।।

No comments: