आले होते एकटी मी, एकटी परत निघाले .
बांधुनी आठवणींची शिदोरी तशिच उपाशी निघाले .
भरली ओंजळी कित्तेकदा मी , दानी सर्व अर्पुनी आले .
चार शब्द आशिर्वचनी ,मुठीत बांधुनी निघाले .
मागितले न कुणास काही ,तरी नियतीला न मुकले .
आता तिच्याच खेळात मी ही, फार फार थकले.
बसले जिथे तिथेच उठले ,एकदाही न मागे फिरले .
जिंकुनी विश्वास मनाचा क्षण सुखाचे हरवुनी बसले .
या जन्मावर हसले रुसले, पदोपदी मी उगाच फसले .
करुनी सर्व उठाठेव मी जगण्याचे मार्ग शिकले .

आठवणींच्या शिदोरीत मी अनुभवांचे बीज पेरिले
गाठ सोडताक्षणी बीजांचे फळे चाखूनी तृप्त झाले .
No comments:
Post a Comment