Monday, 27 February 2017

आचारी नवरा 👨🍴

रोज -रोज काम करते बायको ती बिचारी। 👩🍴                
किती मजा येते जेंव्हा नवरा होतो आचारी। 👨🍴

बायकोला म्हणतो, तू कर आराम। 💤💓
किचन चे आज, माझ्याकडे काम। 🍴🍴

मेनु च्या यादीत पुलाव आणि करी। 🍲🍛
स्वयंपाकाची चालली धावपळ भारी। 🏃🏃

बायकोच्या आनंदाला, येते असे उधाण। 👯👸
सापडेना तिला घरात, आरामाला ठिकाण।👀👀

खवय्येगिरीचा त्या ने मांडला घाट।🙌 💪
'ती' चा काय बघता, आज रुबाबातच थाट। 👸👸

मेजवानीची त्याचा सुटत नाही कोड़ी। 🌾🍸🍹
सुगंधानेच नुसत्या, झाली  ती  वेडी। 👃❤

स्वयंपाकाची त्याच्या , चवच न्यारी।🙆 ✊
बोट चाखत म्हणावे, जणु 'लय भारी '👌💖

नवरा ज्या  दिवशी,करतो खातिरदारी। 💑🍰
करून घ्यावी 'ती' ने, मजा तेंव्हा सारी। 💅💝

असा एखादाच दिवस, क्वचित कधी रविवारी।🏠🚪
दुसऱ्या दिवशी पुन्हा काय? बायको ती बिचारी🍴👩।

No comments:

Post a Comment