Sunday, 12 November 2017

आई -बाबा ..... तुमचा माझ्यावर भरोसा नाय काय ?

आई -बाबा ..... तुमचा माझ्यावर भरोसा नाय काय ?..  नाय काय?

आईची मी आहे लाडकी .... लाडकी .... 
मार्क्स ची पडते मला कडकी .... कडकी .... 
सायन्स चा होतो किती झोल झोल....  झोल झोल.... 
आई -बाबा तु माझ्याशी गोड बोल....  गोड बोल.... 

आई -बाबा ..... तुमचा माझ्यावर भरोसा नाय काय ?..  नाय काय?
बाबांची असते जेंव्हा सुट्टी.... सुट्टी .... 
इतिहासाशी जमते गट्टी .... गट्टी .... 
भूगोलाचा, 'भु'  कसा गोलगोल.... गोलगोल .... 
आई -बाबा तु माझ्याशी गोड बोल.... गोड बोल.... 

आई -बाबा ..... तुमचा माझ्यावर भरोसा नाय काय ?..  नाय काय?
दादा जसा माझा न्युटन .... न्यूटन .... 
गणितात माझा यु टर्न.... यु टर्न 
इंग्लिश चा जातो कसा  तोल -तोल.... तोल -तोल .... 
आई -बाबा तु माझ्याशी गोड बोल....  गोड बोल.... 

आई -बाबा ..... तुमचा माझ्यावर भरोसा नाय काय ?.. नाय काय?
स्वभाव जरी माझा हट्टी..... हट्टी 
नका करु माझ्याशी कट्टी.... कट्टी
वाचा माझेही मन जरा खोल खोल....  खोल खोल .... 
भविष्याचे मलाही आहे मोल मोल.... मोल मोल....
आई -बाबा तु माझ्याशी गोड बोल....  गोड बोल.... 

आई -बाबा ..... तुमचा माझ्यावर भरोसा नाय काय ?..  नाय काय?

No comments:

Post a Comment