Saturday, 20 June 2020

सुर्य

पाऊस न रूचे मनाला,
मळभ चढले आकाशाला,
तुझे ढगाआड असे लपून बसणे,
पटलेच नाही मला.
पहिला पाऊस म्हणजे प्रेमाचे व्यक्त निदान,
कवींचे विधान,सुरांचे उधाण,
पण हा पाऊस म्हणजे व्यथांचे साधन, मनाचे बंधन.
खरंच दोष कुणाचा??
या वर्षीच्या पावसाचा की मनातल्या भीतीचा??
का तुझे असणे दिलासादायक वाटते?
तुझ्या तेजोमय प्रकाशात हे गगन ठेंगणे,
आणि सदन प्रकाशमय भासते..
तू जरी प्रसंगी तप तप तापतो,
कधी रखरखीत तर कधी सौम्य भासतो,
का कोण जाणे मला तू माझ्या बापा प्रमाणे वाटतो. 

No comments:

Post a Comment