मन खरे सांगती माझे ,उच्चार जरी खोटे।
शब्द खरे बोलती माझे ,अर्थ तेवढे खोटे।
आवडे संगत तुझी ,पण वागण्यात विसंगती।
राहतो निर्भय जरी ,मग मनात कसली भिती ?
सावध होतो आजही थोड़ा, का तुझ्या येण्याने ?
काय फरक पडतो असा, तुझ्या असण्याने?
टाळतो कित्तेकदा तुला, विविध कारणाने।
तसेही काय अड़ते माझे, तुझ्या नसण्याने।
भरगच्च मैफील माझी,आजही सवंगड्यांनी।
अवघडती मन का माझे, तुझ्या एकांतानी ?
समजावतो स्वतःस मग मी, ना -ना बहाण्यांनी।
पुरता गार झालो ग फक्त, तुझ्याच आठवणीनी।
शब्द खरे बोलती माझे ,अर्थ तेवढे खोटे।
आवडे संगत तुझी ,पण वागण्यात विसंगती।
राहतो निर्भय जरी ,मग मनात कसली भिती ?
सावध होतो आजही थोड़ा, का तुझ्या येण्याने ?
काय फरक पडतो असा, तुझ्या असण्याने?
टाळतो कित्तेकदा तुला, विविध कारणाने।
तसेही काय अड़ते माझे, तुझ्या नसण्याने।
भरगच्च मैफील माझी,आजही सवंगड्यांनी।
अवघडती मन का माझे, तुझ्या एकांतानी ?
समजावतो स्वतःस मग मी, ना -ना बहाण्यांनी।
पुरता गार झालो ग फक्त, तुझ्याच आठवणीनी।
No comments:
Post a Comment