Saturday, 11 October 2014

मित्र

मित्र असावा तुझ्या सारखा ,जिथे गार वाटे उन्हाळा।
विसरेल जेंव्हा मिच मला ,दर्पण जणू होणारा।।

खेळ माझे मातितले,ज्याच्या सोबत खेळले। 
घर माझे स्वप्नातले, ज्याच्या सोबत बांधले।।

ऐकेल ना  मन माझे ,सांगणे माझेच जिथे।
तिथे सोबती शब्द तुझे ,बोलतील मुके जग माझे।।

ज्याच्या जोरावर असे ,भांडण सारे माझे। 
ज्याच्या नसण्याने ,हसणे ही व्यर्थ माझे।। 

असा  मित्र असावा, आयुष्याच्या बरोबरीने। 
ज्याच्या सोबतीने ,हारणे जणू  जिंकणे माझे।। 

No comments:

Post a Comment