Sunday, 12 October 2014

असे का?

तु असतांना नकोस मला
तु नासतांना हविस का?

मी कसा मोकळा असतो
तु अशी बंदिस्त का?

तुझ्या शांत चेहऱ्यावरती
ही अशी बेचैनी का?

तुला सामोरे जातांना
माझ्या मनाला खंत का ?

तुझ्या प्रत्येक भेटीने
मी थोडा चिंतित का?

तु निर्मळ हसल्याने
मग मी बिंदास्त का?

पारदर्शी आरशावरती
अजाणतेचा मुखवटा  का ?

माझ्याच प्रश्नांच्या चौकटीत
मी तुझा गुन्हेगार का?

No comments:

Post a Comment