Monday, 13 October 2014

ओळख

वाटेत भेटते माझ्या
वाट तुझी मोकळी।
ओळख ही जन्मांची जडली
तरी वाटे अनोळखी।।

शब्द तुझे वचन वाटे
भावना ती कोवळी।
ओळख ही जन्मांची जडली
तरी वाटे अनोळखी।।

अबोल तुझे बोल झाले
तोडनी आशेची पाकळी।
ओळख ही जन्मांची जडली
तरी वाटे अनोळखी।।

स्मरुनी निर्विवाद आठवणी
उमले अस्मितेची पाकळी।
ओळख ही जन्मांची जडली
तरी वाटे अनोळखी।।

No comments:

Post a Comment