Monday, 13 October 2014

प्रित

उगम कुठे प्रेमाचा होई ?
कुठे होत असे अंत ?
असे भास मनाचा
की जाणिवेची खंत ?

कोण, कधी अन कसे भेटते ?
नसे ठाऊक कुणा।
हरवुनी जातो,तोडुनी जातो
कित्तेक बंधना।

का कळेना आस लागे।
जिवात ह्या प्राण भासे।
गंध मग श्वासात दाटे।
विश्वास जसा अंतरात नांदे।

मनात एक तार वाजे।
पाहता दर्पणी स्वरुप लाजे।
मिश्किल भाव डोळ्यात साजे।
नजरेला अनोळखी चाहूल लागे।

गीत हे की रीत ही ?
मनाची जणू जीत ही।
मग वेळेची का रीत ही ?
जणु नवख्या जाणिवेची प्रीत ही. 


No comments:

Post a Comment