Wednesday, 15 October 2014

थरकाप

काय काळजात असा थरकाप उठतो?
मी  माझे असणे हा शब्द भास वाटतो।
नाद होतो खुळा अन अधीर साद दाटतो।
काय काळजात असा थरकाप उठतो ?

होई जिथे आशेची सांगता।
शोधी पाऊल वाट निराशा।
भावनांचा विरोधी मेळ साचतो।
काय काळजात असा थरकाप उठतो ?

काही निसटलेले क्षण वगळता।
भाष्य करी जी उरली मनिषा।
टीपलेले काही भाव वेचतो।
काय काळजात असा थरकाप उठतो ?

मार्ग भेटतो रस्ता चुकता।
चुकांवरही ठेवल्या होत्या आशा।
अशा वाटेत मी का थांबतो ?
काय काळजात असा थरकाप उठतो ?



No comments:

Post a Comment