Wednesday, 15 October 2014

कादंबरी

नाही होणार तू माझा 
हे माहीत होते मला। 
म्हणून सरसावले मागे थोड़े ,
तुझ्या पुढत्या प्रत्तेक पावलाला। 

आली होती ध्यानी माझ्या 
एक सुन्दर कथा 
कोरली गेली प्रत्तेक पानी 
तुझ्या मनाची व्यथा। 

उरली न जागा आता 
का ? असे ही लिहाया। 
होऊनी बसली आज जणू 
ही एक पुराण गाथा। 

पाने झाली जीर्ण आता 
अक्षरे ही पुसट झाली। 
निटनेटकी लिहीली तरी 
चर्चेला कारण झाली। 

शोधाया कोशातले अर्थ या 
तुलाही कष्ट लागले। 
तुझ्या लेखी कादंबरीस ह्या 
केंव्हाच मरण आले। 

मी मात्र वाचनास 
रोज बहाणे शोधले 
प्रस्तावने सह इति- श्री  गत
सारेच पाठ झाले। 

No comments:

Post a Comment