आज सांगतो तुला गुलाबा
तुझ्या कळीची कहाणी
नाजुक न ती जाई परी
तरी अंतरातूनी कोवळी।।
गुंतली गुंत्यात स्वतःच्या
नाही अजुनि मोकळी
फुलेल मुक्तपणे बघ ती ही
उकलूनी एकेक पाकळी।।
वेगळे केलेस तु कळीला
दिला साथ तिचा सोडुनी
भुंगा ही रुसला तिच्यावर
बिचारी गेली कोमेजुनी।। .
सौंदर्य तिचे जाण सख्या रे
तुच तिचा सोबती
खुलते कशी बघ आनंदुनी मग
भोवती काटे सांभाळुनी।।
No comments:
Post a Comment