Thursday, 20 November 2014

कलावंत

विविध रंगांनी रंगलेली,
सुंदर असते रंगभूमी।
पात्र कितीही रंगले तरी
शेवटी एक कलावंत मी।

 सतेज कौशल्य माझे,
कित्तेकदा केले सिद्ध मी।
दाद मिळो न मिळो पण
नविन नाट्यास तयार मी.
अस्तित्व माझे मिच जाणूनी,
झालो बोलका भावला मी।
पात्र कितीही रंगले तरी
शेवटी एक कलावंत  मी

कुणी शोधती राजस्व माझे,
कुणा सापडे वैराग्य।
कधी वाटते सोंग सारे,
कधी होई तेचि सत्य।
डाव घडी दो घडीचा असूनी,
झालो स्वतःशिच मुका मी। 
 पात्र कितीही रंगले तरी
शेवटी एक कलावंत  मी।

जीवन माझे ठरविणारा,
तो पडद्यामागचा कलाकार।
त्याच्या लौकिक भावनांचा,
 मी खरा साक्षीदार।
भागीदार अनेक भावनांचा झालो,
बनु कसा शिल्पकार मी। 
पात्र कितीही रंगले तरी
शेवटी एक कलावंत  मी।

No comments:

Post a Comment