आज माझ्यासवे माझे अश्रु ही पुसती ,
का गेलास दुर तू असा , दुर -दुर निघुनी,
सारे नाते तोडुनी ?
तु सांगितले न जरी काही ,नयन तुझे बोलती,
तार तुझ्या अंतरीचा ,अजुनही मनात सलती ,
जाऊ नकोस ना तू असा ,खेळ खेळूनी ,
सारे नाते तोडुनी।
असे अपुरे शब्द तुझे, काळीज हे चिरती,
बंधन हे जन्मांचे तरी, क्षणात का तुटती,
जाऊ नकोस ना तू असा, सारीपाठ मांडूनी,
सारे नाते तोडुनी।
वागणे तुझे मज दुरावा मागती,
तरीही वेडे मन माझे का सांगती ?
येशील तू येशील परत केंव्हातरी,
नवे स्वप्न घेऊनी।
का गेलास दुर तू असा , दुर -दुर निघुनी,
सारे नाते तोडुनी ?
तु सांगितले न जरी काही ,नयन तुझे बोलती,
तार तुझ्या अंतरीचा ,अजुनही मनात सलती ,
जाऊ नकोस ना तू असा ,खेळ खेळूनी ,
सारे नाते तोडुनी।
असे अपुरे शब्द तुझे, काळीज हे चिरती,
बंधन हे जन्मांचे तरी, क्षणात का तुटती,
जाऊ नकोस ना तू असा, सारीपाठ मांडूनी,
सारे नाते तोडुनी।
वागणे तुझे मज दुरावा मागती,
तरीही वेडे मन माझे का सांगती ?
येशील तू येशील परत केंव्हातरी,
नवे स्वप्न घेऊनी।
No comments:
Post a Comment