Friday, 21 November 2014

सात जन्मांची यातना

हरविले ते बोलणे तूझे, हरविले ते हासणे।
जणु हरविले आज, कोऱ्या नभातील चांदणे।

हरविले ते लाजणे तुझे ,हरविली टी धूंद।
जणु हरविला साऱ्या फुलातील सुगंध।

हरविला तो ध्यास तुझा ,हरविली ती आस।
जणु हरविला वर्षाऋतुतील श्रावणमास।

हरविल्या त्या गोष्टी तुझ्या , हरविली ती मस्ती।
जणु उठली माझ्या, गावातील सारी वसती।

हरविले ते स्वप्न तुझे , हरविली ती कल्पना।
जणु भोगली मी ,सात जन्मांची यातना।

No comments:

Post a Comment