Saturday, 3 January 2015

कळले न मला

वाणीवर तुझ्या भाळुनी गेले
कळले न मला , मी कधी तुझी झाले।।धृ।।

रुप तुझे न कधी पाहीले,
डोळे मिटुनी शोधण्यास निघाले
समोर तुला पाहुनी विचारात पडले,
ऋण कुणाचे हे मला लाभले
 कळले न मला , मी कधी तुझी झाले  ।।१।।

मनात होते भाव अथांग।
शब्द अपुरे गुंफण्य़ास आज।
प्रिती मागते तुझी ही दास।
याविण काही नसे मनात आस।
अश्रु माझे तुझ्या डोळ्यात पाहिले
 कळले न मला , मी कधी तुझी झाले   ।।२।।

No comments:

Post a Comment