Saturday, 3 January 2015

शोधात माझ्या

शुभ्र ओल्या पहाटे,तुझीच आठवण येते।
ऐकून  मुग्ध  स्वर पक्षांचे, वाटे तु इथे असावे।
स्वछंद  विहार करावा, लेवुनी अग्निपंख।
थोड्यातच लाल किरण यावे, होताच मी ही दंग।
किमया किती ही निसर्गाची, कळी ही  तेंव्हाच उमलावी।
तशीच गालावर तुझ्या, हास्य कळी फुलावी।
फुलपाखरु ही यावे, शोधात फुलांच्या।
चारही दिशा होताच, धुंद मग वाटे ,
यावे तुही असेच, शोधात माझ्या। 

No comments:

Post a Comment