Wednesday, 21 January 2015

होळी

असा रंग नवा प्रत्येक होळीचा।
घास गोड हा पुरणपोळीचा।
सण हा  ही  माझ्याच मातीचा।
असा रंग नवा प्रत्येक होळीचा।

पेटवूनी दुर्गुण सारे उधळण ही  आनंदाची।
सुखाला चेहरा नसतो महती हीच गुलालाची।
मिसळुनी रंग सारे, रंग नवा उत्साहाचा।
असा रंग नवा प्रत्येक होळीचा।

नाद उठतो आजही , कृष्णाच्या बासुरीचा।
कासावीस होतो जीव , अजुनही राधिकेचा।
भास होतो अंतरी ,जणु गोकुळाचा।
असा रंग नवा प्रत्येक होळीचा।

No comments:

Post a Comment