Tuesday, 20 January 2015

लपंडाव

दमले बालपणीचे वेडे खेळ खेळुनी।
सोबती हरविले सारे,मी  खेळते अजुनी

लगोरी  अपार कष्टांची ठेवली उभारुनी।
धाव स्पर्धेतच माझ्या मी हरते अजुनी।

दण्डासाखळीत अनुभवांच्या साखळ्या बांधुनी।
आंधळीकोशिंबीरीचा डावच मी देते अजुनी।

उंच यशाची गिल्ली फेकण्यास दांडुनी।
लपंडाव मनाशीच माझ्या मी खेळते अजुनी।

No comments:

Post a Comment