Wednesday, 21 January 2015

झुंज

अशीच झुंज परत एकदा होऊ दे आता।
विजयपताका रोवण्यास आलो, कळु  देच आता।

एक शस्त्र घेऊ दे , निःशब्द राहू दे।
मनगटातले बळ आमच्या, दिसुदेच आता।
अशीच झुंज परत एकदा होऊ दे आता।

एक श्वास घेऊ दे , धगधगते रकत शांत करू दे।
मिटले न डोळे आम्ही ,सांगु देच आता।
अशीच झुंज परत एकदा होऊ दे आता।

एक ललकारी देऊ दे , एकटे न कुणीही इथे समजुदे।
आलो सारे मातृभूमीसाठी, जाणऊ देच आता।
अशीच झुंज परत एकदा होऊ दे आता।

एक तिरंगा फडक़ाऊ दे , रक्षक त्याचे आम्हा ठरू दे।
हीच शपथ परत एकदा, घेऊ देच आता।
अशीच झुंज परत एकदा होऊ दे आता।

No comments:

Post a Comment