Tuesday, 20 January 2015

क्षणभंगुर

क्षणभंगुर असे स्वप्नांचे घरटे ,
विसाव्याला ज्याच्या छोटी पाखरे।
पाखरे उड़ती पंखांसवे ,
अन घरटे पड़ती आश्रयासवे।

क्षणभंगुर असे स्वप्नातील तारका ,
आस्वादाला ज्याच्या पुनवचा चंद्रमा।
तारा तुटतो पापणी लवता ,
अन चंद्र निघतो अमावस्ये करीता।

क्षणभंगुर असे स्वप्नातील स्वप्ने ,
बघावयास ज्यांना मिटावी लोचने।
स्वप्ने तुटती डोळे उघड़ता ,
अन डोळे पाणावती स्वप्ने तुटता।

No comments:

Post a Comment