Thursday, 29 January 2015

वादळी सप्तपदी

पहीले वादळ उठले जेंव्हा जन्म तुझा झाला.
वारस हवा होता घरादाराला , 
म्हणुन धुमाकुळ उडाला.

दुसरे वादळ उठले जेंव्हा पाऊल तुझे शाळेकडे वळले.
शिक्षणाचा तुझ्या उपयोग काय आम्हाला ?
म्हणुनी काळ पालटला.

तिसरे वादळ उठले जेंव्हा सोळा हे वय तुझे झाले.
सर्वाहुनी निराळीस तू या स्थितीला.
म्हणुनी वर्ष सांभाळीले.

चौथे वादळ उठले जेंव्हा सनईचा सुर कानी पडला.
परक्याचे धन तू होशिल येणाऱ्या घडीला.
म्हणुनी वेगळे केले बाहुलीला.

पाचवे वादळ उठले जेंव्हा येणाऱ्या मुहूर्ताला.                                       
सीतेप्रमाणे अग्निपरीक्षेत उतर,गरज पडली जर तुझ्या संसाराला.
म्हणुनी सावरले स्वतःला.

सहावे वादळ उठले जेंव्हा कन्यादानाला.
विसरू नको पोरी कधी, तू  माहेराला.
म्हणुनी आवरले अश्रुधारेला.

सातवे वादळ उठण्याआधी सांगितले तुला.  
प्रेमाचा स्तम्भ उभार अपुल्या घरी तू ,
सुरुवात ही चक्रीवादळाला .

No comments:

Post a Comment