आहे का रे तुझ्यापाशी वेळ थोडा बाप्पा ?
करायच्या आहेत मला खुप -खुप गप्पा।
किती रे तुझ्याकडे येतात रोज लोकं ।
खात आसतील बसुन तुझ किती -किती डोकं .
कंटाळत नाही का रे तु कधी -कधी।
सगळेच येऊन मागतात तुझ्याकडे बुद्धी।
परवा एक काका आले तुझ्याकडे।
बघत होतो मी सारखा त्यांच्याकडे।
हात जोडून तुला ते बोलत होते मनात।
काहीच गडया येत नव्हतं माझ्या रे ध्यानात।
काय सांगु तुला हसलो मी किती।
वाटत होती त्यांना कसली रे भिती।
एकवीस मोदक आजी माझी तुझ्या साठी करते।
माझ्या मात्र हातावर एकच ठेवते।
सांग ना मला तू ती अशी का रे वागते।
विचारले मी तर जोरात दाटते।
किती रे सर्वांना तू आवडतो।
तरी का दहा दिवसच थांबतो ?
करायच्या आहेत मला खुप -खुप गप्पा।
किती रे तुझ्याकडे येतात रोज लोकं ।
खात आसतील बसुन तुझ किती -किती डोकं .
कंटाळत नाही का रे तु कधी -कधी।
सगळेच येऊन मागतात तुझ्याकडे बुद्धी।
परवा एक काका आले तुझ्याकडे।
बघत होतो मी सारखा त्यांच्याकडे।
हात जोडून तुला ते बोलत होते मनात।
काहीच गडया येत नव्हतं माझ्या रे ध्यानात।
काय सांगु तुला हसलो मी किती।
वाटत होती त्यांना कसली रे भिती।
एकवीस मोदक आजी माझी तुझ्या साठी करते।
माझ्या मात्र हातावर एकच ठेवते।
सांग ना मला तू ती अशी का रे वागते।
विचारले मी तर जोरात दाटते।
किती रे सर्वांना तू आवडतो।
तरी का दहा दिवसच थांबतो ?
No comments:
Post a Comment