Friday, 30 January 2015

शिकार

जीवन जेथे जेथे असते।
दुःख तेथे तेथे नांदते
म्हणूनच हिरव्या तृणांवरती 
विळा मुक्त्त विवरण करतो।

जीवन जेथे जेथे असते।
दुःख तेथे तेथे नांदते।
म्हणूनच दाट वृक्षांच्या खोडावर
कुर्हाड हस्त विहार करते।

जीवन जेथे जेथे असते।
दुःख तेथे तेथे नांदते।
म्हणुनच का त्या उडत्या पक्षाच्या
शरीरा छेदुन बाण जातो।
 
जीवन जेथे जेथे असते।
दुःख तेथे तेथे नांदते।
म्हणुनच का त्या सुंदर हरिणाची
कस्तुरीच जीवघेणी होते।

 जीवन जेथे जेथे असते।
दुःख तेथे तेथे नांदते।
म्हणुनच का वाघाची सुशोभित कातडी
अमुच्या घराची शोभा होते।

जीवन जेथे जेथे असते।
दुःख तेथे तेथे नांदते।
सर्व जीवांचा शिकारी तो
शिकार असतो  संघर्षाचा ?


संघर्षाला स्विकारुनी
माणूसकीला  जपणारा 
मानकरी होतो यशाचा 
वाटेकरी तो आनंदाचा. 

जीवन जेथे जेथे असते।
दुःख तेथे तेथे नांदते।
विचारांती मग  ठरवावे 
आपण 'शिकारी' की 'माणुस' व्हावे ?

No comments:

Post a Comment