आन म्हणा की शान ,
न उरले भान,अमुची जान
आतातरी जाण मराठी मान।
स्त्री चे हरण ,जाहले मरण ,
असे दशदिशी किती रावण।
उचलला बाण, पेटले रान ,
आतातरी जाण मराठी मान।
फिरंगी भार ,सोसिला फार।
नसे घरदार ,पुरे अपमान।
लाविली धार, हाती तलवार।
लढली नार ,दिले झाशीला वरदान।
जिद्द म्हणा की स्वप्न उरी ठेउनी।
जिंकले गड ,गडावरी गड ,शुर होउनी।
विजेचा तार ,कोसळे पार ,होउनी स्वार
उघड़तो दार ,स्वातंत्र्याचे।
आजही ते दिन ,स्मृती ठेउनी।
अस्तित्वात अमुच्या त्यांचे बीजे रोउनी.
होउदे सुजाण ,येउ दे तुफान ,जागतो जवान।
न थकती काया ,न थकले प्राण ,
आतातरी जाण मराठी मान।
न उरले भान,अमुची जान
आतातरी जाण मराठी मान।
स्त्री चे हरण ,जाहले मरण ,
असे दशदिशी किती रावण।
उचलला बाण, पेटले रान ,
आतातरी जाण मराठी मान।
फिरंगी भार ,सोसिला फार।
नसे घरदार ,पुरे अपमान।
लाविली धार, हाती तलवार।
लढली नार ,दिले झाशीला वरदान।
जिद्द म्हणा की स्वप्न उरी ठेउनी।
जिंकले गड ,गडावरी गड ,शुर होउनी।
विजेचा तार ,कोसळे पार ,होउनी स्वार
उघड़तो दार ,स्वातंत्र्याचे।
आजही ते दिन ,स्मृती ठेउनी।
अस्तित्वात अमुच्या त्यांचे बीजे रोउनी.
होउदे सुजाण ,येउ दे तुफान ,जागतो जवान।
न थकती काया ,न थकले प्राण ,
आतातरी जाण मराठी मान।
No comments:
Post a Comment