बाहुली -बाहुली मला इक गोष्ट सांगशील का?
माझ्या सोबत लहान तु होशील का?
खरी -खुरी मैत्रिण माझी बनशिल का?
बाबा जेंव्हा माझ्यासाठी आणतील ना खाऊ.
आपण दोघी अर्धा -अर्धा वाटून तो घेऊ.
आई जेंव्हा माझ्यासाठी आणेल ड्रेस मऊ.
अगदी तसाच ड्रेस आपण तुझ्यासाठी शिऊ.
मोठी बहीण मी तुझी होईल ना खेळात।
रागवेल मी तेंव्हा तू रडशिल का जोरात ?
'रडू नको ' म्हणून तुला चॉकलेट मी देईल।
आनंदाने कडेवर उचलुन तुला घेईल।
कधी मी डॉक्टर, तु माझी पेशंट।
कधी तू टीचर ,मी तुझी स्टुडंट।
खेळू आपण खेळ रोज वेगवेगळे।
जमेल आपले नाते कासे आगळेवेगळे।
मोठेपणी आपण तुझे लग्न पण करू।
छानसा बाहुला तुला शोधुन आणू।
बाहुली -बाहुली मला खरी गोष्ट सांगशिल का ?
कट्टी करून मला तू सोडून जाशील का?
माझ्या सोबत लहान तु होशील का?
खरी -खुरी मैत्रिण माझी बनशिल का?
बाबा जेंव्हा माझ्यासाठी आणतील ना खाऊ.
आपण दोघी अर्धा -अर्धा वाटून तो घेऊ.
आई जेंव्हा माझ्यासाठी आणेल ड्रेस मऊ.
अगदी तसाच ड्रेस आपण तुझ्यासाठी शिऊ.
मोठी बहीण मी तुझी होईल ना खेळात।
रागवेल मी तेंव्हा तू रडशिल का जोरात ?
'रडू नको ' म्हणून तुला चॉकलेट मी देईल।
आनंदाने कडेवर उचलुन तुला घेईल।
कधी मी डॉक्टर, तु माझी पेशंट।
कधी तू टीचर ,मी तुझी स्टुडंट।
खेळू आपण खेळ रोज वेगवेगळे।
जमेल आपले नाते कासे आगळेवेगळे।
मोठेपणी आपण तुझे लग्न पण करू।
छानसा बाहुला तुला शोधुन आणू।
बाहुली -बाहुली मला खरी गोष्ट सांगशिल का ?
कट्टी करून मला तू सोडून जाशील का?
No comments:
Post a Comment