Tuesday, 3 February 2015

कन्यादान

मन झुलते बापाचे आशेच्या हिंदोळयावर।
चढवावे लागे लेकीस जेंव्हा लग्नाच्या बोहल्यावर।

पाय घासतो बाप अपुले कित्तेक उंबरयावर।
कटाक्ष बांधुनी शोधतो अनुरूप जोड़ीदार।

अनुभवांचे बांधुनी पहाड अपुल्या उरावर।
वर पक्षांच्या अपेक्षा जेंव्हा पड़ती कानावर|

अपेक्षांचे झेलुन ओझे अपुल्या खांद्यावर।      
डौलदार उभा तरी तो स्वागतास उंबरयावर।

पालन -पोषण करूनही केला खर्च शिक्षणावर।
तरी खर्चाला हौस म्हणवितो लग्न मुहूर्तावर।

हृदयात त्याच्या वाकुन पहावे एकदातरी खोलवर।
कंठ दाटुनी,पाझर फुटुनी,खंबीर उभा तो कन्यादानावर।

No comments:

Post a Comment