Wednesday, 4 March 2015

तरुणाई

तरुणाईचा हळवा वारा
ओल्याचिंब पाऊस धारा
फुलांभोवती गुणगुणातो भोवरा
 तरुणाईचा हळवा वारा।

तरुणाईचे जग स्वप्नाळू।
हिरवळ भासे असुनी कोरडी वाळू।
मिठीत घ्यावे कुणीतरी हळू।
तरुणाईचे जग स्वप्नाळू।

तरुणाईचा जल्लोश बघता।
भुलवितो दिशा अन क्षमता।
कसोटीच द्यावी वाट पाहता।
तरुणाईचा जल्लोश बघता।

तरुणाई हरवी देह-भान।
पण भानावर देहाचा मान।
संयम त्यास वरदान।
तरुणाई हरवी देह-भान।

तरुणाईने उंच उड़ावे।
पण पंखांना बळ असावे।
घाव सोसण्या सज्ज व्हावे।
तरी तरुणाईने उंच उड़ावे।

No comments:

Post a Comment