Monday, 2 February 2015

कारण

एक कल्पना विषयावर की विषय कल्पनेचा?
कारण घ्यावे शोधुनी की शोध कारणांचा ?

प्रश्न असा जो उत्तर घेई की उत्तरास मारा प्रश्नांचा ?
कारण घ्यावे शोधुनी की शोध कारणांचा ?

चर्चा अशी जी सदगुण देई की अवगुणांचीच चर्चा ?
कारण घ्यावे शोधुनी की शोध कारणांचा ?

कृती अशी जी शुभेच्छा घेई की स्विक्रुत असे निराशा ?
कारण घ्यावे शोधुनी की शोध कारणांचा ?

प्रशंसा अशी जी पाठबळ देई की पाठबळासाठी प्रशंसा ?
कारण घ्यावे शोधुनी की शोध कारणांचा ?

निंदा नको जी शत्रू वाढवी की करावी शत्रू  परी निंदा ?
कारण घ्यावे शोधुनी की शोध कारणांचा ?

मैत्री अशी जी विश्वास देई की घात करी मैत्रीचा ?
कारण घ्यावे शोधुनी की शोध कारणांचा ?

पैसा असतो जिवनासाठी की जीवन म्हणजे पैसा ?
कारण घ्यावे शोधुनी की शोध कारणांचा ?




No comments:

Post a Comment