अवती -भवती सजीव सृष्टी, मी असे उभी एकटी।
मृगजळ बनले जीवन माझे जणु वरयागत झुलती।
जन्मापासूनी अनेक नाते,असे गाठ बांधूनी।
मी कोण,कुणाची असते,सारेच काही ठरूनी।
नाव असे हे, गांव कोणते,सारे पराधीन असूनी।
शोधू कुठे स्वतःस मग मी अगदी स्वतः पासूनी।
उन,सावली,वारा,पाणी तेच चक्र फिरती।
तेच पक्षी किलबिल करती, तिच गाणी गाती।
काही जाणीव अपेक्षांची मग सोबत मी ठेवती।
प्रत्तेक फ़ेरिगत माझे स्वप्ने मोठे होती।
आज हा वेळ थांबला थोड़ा माझ्याकरिता।
भेटू म्हणे जरासे आपण आज एकमेकांना।
तोच सुर्य तोच चंद्र नाही कुणी साक्षीला।
जीवन तुझे देणे माझे, म्हणे -चल माझ्या बरोबरीला।

No comments:
Post a Comment