समाजिकतेवर प्रश्न उभा हा जाऊ कुठे मी सांग ?
कुठली कचेरी?कुठले मंदीर ? भेटतो कुठे हा न्याय ?
रोज घडतो अन्याय आजही,रोज घडतो अन्याय।
अन्यायाचे रूप अनेक घेई टेबलाखालुन लाच।
भ्याड झाली ज़मात अपुली करी प्रामाणिकतेवर घात।
रोज घडतो अन्याय आजही,रोज घडतो अन्याय।
आरक्षित आहे बाई इथे पण सुरक्षित नाही मान।
दयनिय झाली अवस्था अपुली हरवले संस्कृतीचे भान।
रोज घडतो अन्याय आजही,रोज घडतो अन्याय।
सुशिक्षितांची जमात निराळी पण बेकारीला खुले रान।
सुजाणतेची अवस्था अपुली तरी वाट्याला अपमान।

No comments:
Post a Comment