Monday, 2 February 2015

खेळ कटपुतल्यांचा

हा खेळ कटपुतल्यांचा,  का खेळसी रे आता। 
हृदयी वसुन तू रे, का मोडीसी तो आता ?
बेधुंद जगण्यासी, सोडून तू रे आला। 
निर्बंध देऊनी मना,येऊनी तू रे वसला। 
ज्या तुझ्याच रे बोधाने,उलगडूनी सारे कोड़े। 
ही वाट सुटत जाते ,वहीवाट सुटत जाते। 
ही जात यातनेची, आता सोसेना रे। 
आम्ही तुझीच सारे, तू का न अमुचा रे।

No comments:

Post a Comment