Monday, 2 February 2015

ढग

तू शीत अश्रु गाळले,ते न कुणाला गवसले. 
पानाने उचलले,इरेने पचविले अन शंखाने गिळले. 

तू गरजला ,चमकला अन बरसला,ते सर्वत्र पसरले
पानाने झटकले,इरेने साचविले अन शंखानेसोडीले. 

तू ज्या -ज्या वेळी दाटला,ना गरजला ना बरसला. 
काळोख  तुझा  तूच पचवीला ,ना वाटला  ना रडला. 

तुझे निराशेने दाटून येणे आम्हा कसेच ना झेपले.  
अन आशेने डोळे आम्ही तुझ्याकडे लाविले.              

No comments:

Post a Comment