गुपित सांगते आज जणु मनाचा भार सोसेना.
निकामीच राहील जिथे जना-प्रति मना भावना दाटेना.
मिटल्या पापण्या जणु जळता प्रकाश सोसेना.
मग अंधारात माझ्या मला मीच दिसेना.
झाकले कान जणु यातनेचा गोंगाट सोसेना.
मग नादात कुणाच्या मज माझाच नाद ऐकवेना.
गिळली मुक जणु शब्दांचा भार सोसेना.
भाषेचा माझ्या मलाच आता शब्द सुचेना.
निकामीच राहील जिथे जना-प्रति मना भावना दाटेना.
मिटल्या पापण्या जणु जळता प्रकाश सोसेना.
मग अंधारात माझ्या मला मीच दिसेना.
झाकले कान जणु यातनेचा गोंगाट सोसेना.
मग नादात कुणाच्या मज माझाच नाद ऐकवेना.
गिळली मुक जणु शब्दांचा भार सोसेना.
भाषेचा माझ्या मलाच आता शब्द सुचेना.
No comments:
Post a Comment