देवभोळा एक मी माणुस आहे, माणुस आहे।
तुकडे तुकडे झाले मनाचे तरी मी सांभाळून आहे।
माझ्या आर्त प्रश्नांचे मिळेल का उत्तर ?
अजुनही मी शोधत आहे।। देवभोळा एक मी........
पुजा,अर्चना करुनी झाल्या, सण-वारही सांभाळतो आहे।
उत्सव सारे उत्साहात करतो तरी मी निकामिच आहे।
व्यथेच्या माझ्या कारण काय?

दान धर्म अन पंगती केल्या ,सत्कर्म ही करतो आहे।
गरजवंतांना मदत करतो तरी मी रिक्त आहे।
गरजेचे माझ्या कारण काय ?

खरे बोलायाचे व्रत घेतले ,परिणामही भोगत आहे
प्रामाणिकतेचा विडा उचलला तरी मी उपाशिच आहे।
भुकेचे माझ्या कारण काय ?

द्न्यान साधना रोज करतो ,विद्न्यानाची कास धरतो।
कले पुढे नतमस्तक होतो तरी मी कोठडीत आहे।
सुखाची माझ्या चाबी कुठे ?

No comments:
Post a Comment