Thursday, 6 June 2019

माहेर चा अहेर

माहेरचे कौतुक मनी, साठवून जात आहे.
जवाबदारी घेण्यास नवी, मी सासरी जात आहे.

कोड- कौतूक,लाड़,हट्ट,आई जे पुरवी.
गोष्ट सांगुनी मनातील, चिंता जी हरवी.
प्रेमाचा तिच्या, भाग एक, हळूवार नेत आहे.
माहेरचे कौतुक मनी, साठवून जात आहे.                    
जवाबदारी..........................................

कामातुनी काढत वेळ, माझ्यासाठी झटुनी.            
खोड्या माझ्या कौतुकाने पाठीशी घालुनी.                                  
बाबांशी मैत्री, जी झालीच बालपणी.
आठवण ही मनात सारी, मी जपुनी नेत आहे.
माहेरचे कौतुक मनी, साठवून जात आहे.
जवाबदारी..........................................


स्वतः पेक्षा जास्त जिची, काळजी घेतली आहे.
कितीही भांडले तिच्याशी, तरी प्रेम केले आहे.
लहान बहिणीस अशा, मोठेपण मी, देउनी जात आहे.
माहेरचे कौतुक मनी, साठवून जात आहे.
जवाबदारी..........................................




No comments:

Post a Comment